बोदवड (प्रतिनिधी) तालुक्याला तब्बल सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शुभम राजेश मदने (दांडेकर) यांच्या रुपात पूर्णवेळ तहसिलदार मिळाला आहे.
परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून त्यांना २४ नोव्हेंबर २०२२ ते १६ जून २०२३ पर्यंत तहसिलदार पदावर स्वतंत्र कारभार देण्यात आला आहे. याआधीच्या तहसीलदार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने बोदवड कार्यालयास पुरेसा वेळ देऊ न शकल्याने जनतेची बरीच कामे खोळंबली आहेत. आता ही प्रलंबीत कामे मार्गी लागून लोकांची अडचण लवकर दूर होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.