मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनावर दाखल झाले आहेत. दरम्यान, अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे. अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे.
अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत. जयंत पाटलांकडे विरोधी पक्ष नेतेपद देण्याच्या हालचालींना वेग सूत्रांची माहिती. जयंत पाटील आज दुपारी शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल देशमुख यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी आज नगर येथील कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे.
(बातमी अपडेट होत आहे)