मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेसाठी धाकधूक वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. यावर पुढील सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती.
सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहिल याची शक्यता आता कमी आहे. या आधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना अत्यंत कडक अशा शब्दात ताशेरे ओढले होते. ही सुनावणी दहा दिवसांना लांबणीवर का गेलं, यामागे काय कारण आहे?, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाचे राजकीय भवितव्य सुप्रीम कोर्टातील निकालावर अवलंबून आहे.