पालघर (वृत्तसंस्था) मनोर विक्रमगड रस्त्यावर झालेल्या बस आणि टेंपो अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास पालघरहून अमळनेरकडे जाणाऱ्या बसला टेम्पोने समोरा समोर धडक दिली. ही धडक इतकी भाषण होती की बसचा पुढचा भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर मनोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही बस नाशिक, धुळे मार्गे अमळनेर येणार होती. या अपघातात बस चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त एसटी बसमध्ये विक्रमगडहून जव्हारच्या दिशेने जाणारे ३० प्रवासी होते. अपघातात जखमींमध्ये दयानंद (वय -५४), कैमूद्दीन शेख (वय – ३१), धिरेंद्र यादव (वय-३२), राधेश्याम तिवारी (वय-३८), रवींद्र यादव (वय-४०) आणि एसटी बसचालक तवाब खान (वय-३२) यांचा समावेश आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात इंदोरकडून अमळनेरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीत कोसळली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अमळनेरला येणाऱ्या बसचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येताच अनेकांचा काळजाचा ठोका चुकला होता.