जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या तिघां गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर परिसरात राहणारे तिघे जण असून त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
यांच्याविरुद्ध झालीय कारवाई !
सागरसिंग जिवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी आणि शक्तीसिंग ऊर्फ हग्गु जिवनसिंग जुन्नी अशी राजीव गांधी नगरातील तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला आर्म अॅक्टसह विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. या तिघांच्या हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केली आहे. हद्दपार करण्यात आलेल्या तिघांच्या टोळीने जळगाव शहर व परिसरात दहशत पसरवण्यासह नागरिकांमधे भिती निर्माण केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे.
यांनी केलीय कारवाई !
जळगाव शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. तरी देखील त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे जनतेच्या मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी ही कारवाई केली आहे.
दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातून ७ गुन्हेगार हद्दपार
विशेष म्हणजे जिल्हा पोलीस दलाने दि. २१ डिसेंबर रोजी विविध गुन्हे करून समाजात दहशत माजविणारे एकूण ७ आरोपींना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले होते. त्यात रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल भिका कोळी (रा. पिंप्राळा जळगाव) यास दोन वर्षांसाठी तसेच सावदा पोस्टे. हद्दीतील १) सै. ईकबाल उर्फ सै. भुया अल्लाऊद्दीन (रा. रविवार पेठ सावदा), २) शे. रईस उर्फ मास शे. ईस्माईल रा.गाशिया नगर (सावदा), ३) शे. जाबीर शे. खलील (रा. ख्वाजा नगर सावदा), रावेर पोस्टे. हद्दीतील १) विनोद विठ्ठल सातव (रा. रावेर), २) तुळशिराम सुभाष सावळे (रा. कजद ता. रावेर) व निंभोरा पोस्टे. हद्दीतील सुनिल श्रावण चव्हाण (रा. ऐनपूर ता. रावेर) यांना प्रत्येकी एक वर्ष कालावधीसाठी जळगांव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.