मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील मथुरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवरील मैत्री तोडल्याच्या कारणावरून तरूणानं मैत्रींच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरूणीचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर या माथेफिरूनं तरुणीच्या आईवरही चाकूनं हल्ला करून स्वत:ला देखील जखमी केले. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मथुरामधील शिवम उर्फ अभी कश्यप असं या माथेफिरू तरूणाचं नाव आहे. शिवम लग्नाची पत्रिका देण्याच्या निमित्तानं निवृत्त सैनिक तेजवीर यांच्या घरामध्ये गेला होता. यावेळी तेजवीर यांची पत्नी सुनीता आणि त्यांची 17 वर्षांची मुलगी सोनम या दोघीच घरामध्ये होत्या. शिवमनं प्रथम सोनमला लक्ष्य केले आणि नंतर तिच्या आईवर हल्ला केला. त्यानंतर शिवमनं स्वत:लाही चाकूनं जखमी केले. या सर्व हल्ल्यात मात्र सोनमचा मृत्यू झाला आहे.
सोनम आणि शिवम यांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी सोनमनं बोलण्यास नकार दिला होता, तसंच त्याच्याशी मैत्री देखील तोडली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचललं. तरूणीच्या आईनं यावेळी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिच्यावरही त्यानं हल्ला केला. प्रकरणात पोलीस अधिकारी अजय कौशल यांनी सांगितले आहे.