जळगाव (प्रतिनिधी) कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेल्या नमूना नंबर आठ, फेरफार दाखला, चर्तुसिमा व ना हरकत दाखला हे कागदपत्रे पाहिजे होती. त्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागणी करणार्या विवरा ग्रामविकास अधिकार्यावर निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिगंबर जावळे (रा. भुसावळ), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
रावेर तालुक्यातील विवरे बु. येथील ३७ वर्षीय तक्रारदाराने कर्ज काढण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यासाठी त्याला ग्रामपंचायत कार्यालयातून मधुन नमुना नंबर आठ, फेरफार दाखला, चर्तुसिमा व ना हरकतचा दाखला ही कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने दि. २१ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली. ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी २१ फेब्रुवारी रोजी १० हजार रुपये लाच मागितली होती व त्याचदिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत संशयित आरोपीने ५ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. मात्र संशयितास सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर संशयिताविरोधात मंगळवारी ३० एप्रिल रोजी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी हा पसार झाला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिनेशसिंग पाटील, पोना बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे, चासफौ सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकों प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली