चोपडा (प्रतिनिधी) मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जचा बीआरएस पक्षाकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देखील देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. यावेळी प्रशासनच्या माध्यमातून उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला . पण यावेळी आंदोलन करते यांनी उपोषण सोडण्यास नकार दिल्याने यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या निषेधार्थ आज भारत राष्ट्रीय समितीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. यावेळी बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील,प्रमोद झवर,भिकण सोनवणे, भगवान सोनार,नितीन तायडे, भगवान धनगर,भरत पाटील,कामीन खान, सय्यद इरफान ,प्रा.दिपक आरडेसर,प्रा.सुरेश अत्तरदे,कुणाल बारी,सागर पाटील, यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.