मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील नायगाव येथे धम्मक्रांती फाउंडेशनतर्फे बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळा ४ रोजी पार पडला. विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचा बौद्ध पद्धतीने मंगल परिणय सोहळा झाला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. रोहिणीताई खडसे, उद्घाटक माजी समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश गायकवाड, समाजकल्याण अधिकारी शीला अडकमोल, महिला दक्षता समिती सदस्या सुपडाबाई भालेराव युवराज नरवाडे, ग्रामसेवक रविंद्र मोरे, सहायक फैजदार एस.बी. पोहेकर, नंदुभाऊ हिरोळे, विशाल रोटे, महेंद्र हिरोळे, संतोष झनके, गणेश तराळ, विवाह नोंदणी समितीचे विठ्ठल पोहेकर, लखन पानपाटील, बबलू मेढे, संदीप मोरे, नीलेश सवर्णे, अर्जुन इंगळे, सुनील खंडारे, दीपक धुंदले, पंकज तायडे, बंटी गुरचळ, देवा अटकळे, दिनकर वानखेडे, संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडव, उपाध्यक्ष सिद्धार्थ तायडे, सचिव ” प्रमोद भालेराव, सहसचिव विनोद अढागळे, मयूर अढागळे, धर्मेंद्र तायडे, पंकज पोहेकर, विजय पोहेकर आदी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सोहळ्यात धम्मक्रांती फाउंडेशनतर्फे समाजसेवक समाजभूषण, पुरस्काराने तालुक्यातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत तायडे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रमोद भालेराव यांनी केले. ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.