भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुनसगांव येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने ७२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात गलू जनार्दन भोळे (वय ४२, रा. सुनसगांव ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५ एप्रिल २०२२ रोजी राहते घरातील दरवाज्याचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन घरात प्रवेश करुन घरातील धाण्याचे कोठीतील रोख रक्कम ७५,००० रुपये लबाडीचे इराद्याने चोरुन नेलेला आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ युनूस शेख करीत आहेत.