TheClearNews.Com
Monday, October 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

मध्यरात्रीच्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केली पाहणी !

vijay waghmare by vijay waghmare
October 26, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – शहरातील जी.एस. नगर परिसरातील मंगल कार्यालयाच्या मागे, नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ४७५ मधील कृष्ण-गीता नगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी केली. खर्दे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक तथा कृष्ण-गीता नगर कॉलनीचे अध्यक्ष बी. एम. सैंदाणे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनेत पाच संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून, सुदैवाने घरातून कोणतीही रोकड अथवा दागिने चोरीला गेले नाहीत. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास ही घरफोडी झाली. हे सीसीटीव्ही कॅमेरा पाहिल्यानंतर निदर्शनास आले.

दरम्यान, प्रभागाचे नगरसेवक किरण अग्नीहोत्री यांनी रात्री २ वाजून ४० मिनिटांनी कृष्ण-गीता नगरमधील रहिवाशांना फोन करून मातोश्री नगर परिसरात काही संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी सावध व सतर्क राहावे, असे आवाहन केले. ही माहिती मिळताच कॉलनीतील रहिवासी पी.डी. पाटील व एस.एन. कोळी यांनी तातडीने इतर सदस्यांना फोन करून सतर्क राहण्यास सांगितले याचदरम्यान पंकज मिस्तरी यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता, बी. एम. सैंदाणे यांच्या घरासमोरील लोखंडी गेट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने कॉलनीचे सदस्य पी.डी. पाटील यांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटांत, म्हणजेच पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलीस वाहन घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व होमगार्ड यांनी घटनास्थळाची पाहणी करून घरात प्रवेश केला असता, कपाटांचे ड्रॉवर उघडे असल्याचे तसेच कपडे व साड्या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याचे दिसून आले. सुदैवाने घरातील रोकड किंवा दागिने चोरीला गेले नसल्याचे समोर आले.

READ ALSO

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

घटनेची माहिती मिळताच कॉलनीतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर पडत परिसरात सतर्कता दाखवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाच संशयित चोरट्यांचे चेहरे कैद झाल्याने या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या वेळी पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्यासह कॉलनीचे उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, एस. एन. कोळी, जे. एस. पवार, ज्ञानेश्वर पवार, गोकुळ महाजन, महेंद्र बिवाल, चंदन बिवाल, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, भरत पाटील तसेच कॉलनीतील अनेक नागरिक उपस्थित होते. या घरफोडीच्या घटनेमुळे कृष्ण-गीता नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि संशयितांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBurglary in Dharangaon; five suspects captured on CCTV

Related Posts

गुन्हे

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

October 26, 2026
गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026
गुन्हे

सव्वा कोटी रुपयात फसवणूक करणाऱ्याने आणखी दोघांना गंडविले

October 25, 2026
गुन्हे

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

October 24, 2026
गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

June 6, 2023

जिल्हा प्रशासनातर्फे संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

December 8, 2020

राज्य सरकारची घोषणा ; आमदारांना मुंबईत मिळणार घर !

March 24, 2022

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एरंडोल तालुक्यातील युवक जागीच ठार !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group