जळगाव (प्रतिनिधी) बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील साडेसात हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील आसोदा येथील कलावसंत नगरात घडली. याप्रकरणी तालूका पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव तालूक्यातील आसोदा गावातील कला वसंत नगरात विजय शांताराम पाटील (वय-३६,रा.गट नं.४८७प्लॉट १३) येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. विजय पाटील ११ ते १५ डीसेंबर दरम्यान घर बंद करुन बाहेरगावी गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करुन कपाटातील ३ हजार ७५० रुपयांचे सेान्याचे दागिने आणि साडेसात हजार रुपये रोकड असा ऐवज चोरुन नेला आहे. तालूका पोलिसात विजय पाटील यांनी तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक माणिक सपकाळे करत आहेत.
















