जळगाव (प्रतिनिधी) मोबाईल फोन, फेसबुक व व्हॅट्सअँपद्वारे व्यवसायिकाची ३ लाखांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (वय ४८ रा. १७/२२ शेरा चौक मेहरूण, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ जानेवारी २०२२ ते दि. १ एप्रिल २०२२ चे दरम्यान साबीर खान, पप्पु खान व तौसिफ खान यांनी फिर्यादीचे मोबाईल फोनवर वेळोवेळी संपर्क करुन आसाम येथील Pearl Tea चा व्यवसाय करण्यासाठी फिर्यादी यांचे नावे झायका टीचा ब्रँड बनविण्यासाठी वेळोवेळी फोन पे व SBI Bank मधून तिघांनी स्वत: चे आर्थिक फायदयासाठी ऑनलाईन ३,००,८०५ रुपये वेळोवेळी स्विकारुन फिर्यादी यांना चहाचा कोणताही माल दिला नसून फसवणुक केली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि लिलाधर कानडे करीत आहेत.