अमळनेर (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील हाथसर येथे दलित युवतीवर झालेल्या अत्याचार घटनेच्या विरोधात देशभरात तीव्र निषेध केला जात आहे. याचाच भाग म्हणून अमळनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.
तसेच पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देवून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष मनोज दाजीबा पाटील,नगरसेवक नरेंद्र संदानशिव,कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, नगरसेविका मायाबाई लोहेरे, मुन्ना शर्मा,सत्तारदादा तेली,फयाजदादा पठाण, नगरसेवक सलीम टोपी,अहमद पठाण,प्रविण जैन,रज्जाक शेख, गजेन्द्र साळुंखे,कादर जनाब,राजु शेख,सईद दादा,संतोष लोहारे, मनोज बोरसे,महेश पाटील,तौसिफ तेली, जुबेर पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.