जळगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा मार्केटमधील हॉटेल लयभारीमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकीत कारवाई केली होती. याप्रकरणी हॉटेलच्या व्यवस्थापकास कर्मचाऱ्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवीन बस स्थानका शेजारी असलेल्या चोपडा मार्केटमधील लय भारी हॉटेलवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथक तयार करून चोपडा मार्केट येथे रवाना केले. तेथील हॉटेल लयभारी येथे बनावट ग्राहक पाठवून पोलिस आत गेले असता मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाल्याने पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला होता. याठिकाणाहून पाच महिलांसह पाच पुरुषांना ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलचा व्यवस्थापक सागर बापू अहिरे (वय २८, रा. तिसगाव, जि. नाशिक), हॉटेल कामगार सोमनाथ बबन पवार (वय २२, रा. उमराणा, जि. नाशिक), जयेश उर्फ पाच्या देविदास तायडे (वय-२७, रा. हरिओम नगर), किरण विजय सुरवाडे (वय ३०, रा. तांबापुरा ), प्रवीण अहिरे (संपूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालक अद्याप फरार आहे.