कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील आज मंगळवार रोजी आठवडे बाजार भरतो या दिवशी लॉकडाऊन पुकारले होते. या लॉकडाऊनला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आठवडे बाजार पूर्णपणे बंद होता तसेच बंद असताना नेहमीच बिर्ला चौकात लोकांची गर्दी दिसत होती. यावेळेस पण बिल्ला चौकात कडकडीत बंद दिसला. लोकांनी स्वतःहून काळजी घेतल्यास कासोदा येथे कोरोना तडीपार होईल असे जाणकारांचे मत आहे.