बोदवड (प्रतिनिधी) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन सुरु केले असून त्याचा भाग म्हणून तालुक्यातील जलचक्र बुद्रुक गावी मोफत मोतिबिंदु तपासणी शिबिर नुकतेच पार पडले.
यावेळी 117 लोकांची तपासणी झाली. यात मोतिबिंदुचे 21 रुग्ण , पडद्याचे 6 रुग्ण , नासुरचे 4 असे एकूण 31 असे रुग्ण निदान झाले. या रुग्णांवर रुग्णांवर मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथे पुढील उपचार होणार आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिबिराचा व्हिडिओ काॅलद्वारे आढावा घेतला. यावेळी बोदवड नागरपंचायतीचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, माजी जि.प.सदस्य डाॅ उद्धव पाटील, नगरसेवक सुनिल बोरसे, गोपाळ पाटील यांनी भेट दिली.
शिबिराचे आयोजन आमीन मुलतानी, सोमेश्वर पाटील, नितीन पाटील यांनी केले होते. तर जिलानी मुलातानी , धनराज पाटील, अमोल पाटील, नितीन इंगळे, मयुर पाटील, विजय सपकाळ, अक्षय पाटील, प्रतीक पाटील, संदिप पाटील, चेतन पाटील, गजानन राऊत, रमजान मुलतानी, फिरोज मुलतानी,जिवन पाटील, ईश्वर शळके, पंडित घुले, योगेश पाटील, अरुन गोसावी, संतोष खरे, उमेश पाटील व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजनात सहकार्य केले.