पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात CBI बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. याआधी देखील अनेक वेळा अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती.
उद्योगपती अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी केली आहे. पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर सकाळीच सीबीआयने छापा टाकला. येस बँक आणि DHFL घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी केली असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मुंबई आणि पुण्यातील ८ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी संजय छाबरिया याना अटक करण्यात आली होती. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहे. दरम्यान या पूर्वी देखील गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.