जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेताना माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असं मी गंमतीने म्हणालो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आपलं काम अजून बाकी आहे. त्यांनी ईडी लावली, आता सीडी लावण्याचं माझं काम बाकी आहे, असा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी दिला आहे.
राष्ट्रवादी संवाद यात्रेला संबोधित करताना एकनाथराव खडसे यांनी हा इशारा दिला. काल गुरुवारी रात्री १२ वाजता जामनेर येथे राष्ट्रवादी संवाद यात्रेला एकनाथ खडसे संबोधित करत होते. सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथराव खडसे यांनी दिला आहे. खडसे यांच्या या इशाऱ्यामुळे जिल्ह्यासह राज्यात पुन्हा खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
















