चोपडा (प्रतिनिधी) पोलिस प्रशासनाकडून कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता आम्ही घेत असतो. परंतु गणपती मंडळांकडून ही तितकेच सहकार्य आम्हाला मिळावे, अशी अपेक्षा आहे. आमची अपेक्षा तर इतकीच आहे की, पोलीस प्रशासनातील अधिकारी हा आपल्या परिवारा सोबत गणपती विसर्जनात सामील होईल आणि तोही आनंद घेईल तोपर्यंत खरा आदर्श विसर्जन होऊच शकत नाही. थोडक्यात सर्वांनी गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करावा, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चोपडा येथिल कै. शरदचंदरिका नाट्यगृह मंदिररात शांतता कमेटी बैठकित ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रांतअधिकारी एकनाथ भंगाळे, सहा.पोलीस अधीक्षक चोपडे, डीवायएस पी. ऋषिकेश रावले, मुख्यधाकारी हेमंत निकम,पोलीस निरीक्षक के.के.पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर, आदी प्रशासनाचे अधिकारी हजर होते.
यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे शेवटचे 2 तास वाढवून मिळावे आणि अतिउत्साहमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून थोडी फार चूक झाली तरी आपण गुन्हे दाखल करू नका. आम्ही तुम्हांला त्रास होईल असे कोणतेही काम करणार नाही याची ग्वाही देतो, असेही अरुणभाई म्हणाले !
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी देखील आपले विचार मांडले. तसेच पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी भटू पाटील, सलीम कुरेशी, अनिल वानखेडे, गजेंद्र जैस्वाल, प्रदीप पाटील, डॉ. रवी पाटील, घनश्याम अण्णा पाटील, आदी लोकांनी येणाऱ्या अडचणींवर प्रशासनाला अडचणी मांडल्या रोटरी क्लब चोपडाने निर्माल्य बॉक्स देणार आहे. व स्वतः गोळा करून घेणार आहेत एकंदरीत शांतता समितीची बैठक शांताता मध्ये पार पडली.