चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक ८ मार्च, २०२२ (मंगळवार) रोजी विद्यार्थी विकास विभाग (युवतीसभा) व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक महिला दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या स्त्रियाचा सन्मान सोहळा संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा आशाताई विजय पाटील उपस्थित होत्या. तर सत्करार्थी विजयाताई प्रभाकर पाटील (राजकीय महिला प्रतिनीधी), डॉ. कविता रविंद्र पाटील (डॉ. प्रतिनिधी), सुरेखा मोतिराम माळी (नगर सेविका), विमलबाई देवा साळुंखे (नगर सेविका), सुप्रिया सनेर (आरोग्य सभापती, नगरपालिका), प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही टी. पाटील, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के. एन सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पी. के. लभाने, युवतीसभा प्रमुख डॉ. पी. एम. रावतोळे आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उदघाटन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री कै. ना.अक्कासो. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख डॉ. पी. एम. रावतोळे यांनी केले.
त्यानंतर सत्कारार्थी विजयाताई प्रभाकर पाटील (राजकीय महिला प्रतिनिधि) यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना संगितले की, ‘कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना असंख्य असे अडथळे येत असतात व त्यावर मात करून आपली प्रतिभा सिद्ध करायची असते. त्याचवेळेला आपल्याला प्रतिष्ठा मिळते. तसेच यावेळी त्यांनी अनेक संघर्षाना तोंड देत कणाकणाने ही सामाजिक प्रतिष्ठा कशी प्राप्त केली याविषयी अनुभव कथन केले. सुप्रिया सनेर (आरोग्य सभापती, नगरपालिका) यानीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री कै.ना.अक्कासो.सौ.शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी अथक परिश्रमाने ही ज्ञान गंगा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी चोपड्यात आणली. त्याचा विद्यार्थ्यानी लाभ घेतला पाहिजे व वाईट मार्गाला न जाता महिलांचा सन्मान करून ज्ञानर्जन करावे, असे आवाहन केले. मा.डॉ. कविता रविंद्र पाटील (डॉ. प्रतिनिधि) ‘विविध नारीशक्ति’ याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तदनंतर कु. बिस्त आरती ह्या विद्यार्थिनीनेही परखडपणे महिला दिनाबद्दल आपली प्रतिक्रिया मांडली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, ‘विद्यार्थिनींनी अडथळ्याना न घाबरता त्यावर मात करून आपले कर्तृत्व सिद्ध करावे व स्वतः ची एक ओळख निर्माण करायला हवी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. मोक्षिका सुलताने हिने केले तर आभार बी. एच. देवरे यांनी मानले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्रसिद्धी समिति प्रमुख संदीप पाटील, महिला तक्रार समिती प्रमुख एम. टी. शिंदे, डी. डी. कर्दपवार यांचेसह अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस.ए. वाघ, रजनी जैस्वाल, संगिता पाटील, पूजा पूनासे, कु. स्नेहा राजपूत, कु आशा शिंदे, कु. पल्लवी कासार, शाहीन पठाण व प्राध्यापक भगिनींनी परिश्रम घेतले.