अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिरात आज पारंपारिक पद्धतीने वसुबारस साजरी करण्यात आली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी व मंदिरातील गोमातांची सपत्नीक पूजा केली. वसू बारसनिमित्त पुरोहित मंडळींनी विशेष मंत्रोच्चार केले.
यावेळी संस्थेचे सचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, सेवेकरी विनोद कदम, आर. जे. पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील आदींसह अनेक भाविक उपस्थित होते. यावेळी गोमातेचा व मंगळ देवाचा जोरदार जयघोष करण्यात आला.