धरणगाव (प्रतिनिधी) युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हा आगळा वेगळा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवा सेना प्रदेश सचिव वरून सरदेसाई, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ. जि.प सदस्य प्रतापराव पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी शिवराज पाटील यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेनेतर्फे आंदोलन संपन्न झाले.
धरणगाव तहसील येथे युवासेनातर्फे तहसीलदार यांचे प्रतिनिधी महसूल सहाययक गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आले. थाली बाजावो खुशीया मानव, आबाकी बार पेट्रोल सौ के पार अश्या अनेक घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित चेतन पाटील, विलास ननवरे, अनिकेत पाटील, दीपक भदाणे, स्वप्नील ननवरे, शाहरुख पटेल, विनोद रोकडे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.