अकोला (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सभापती सुनिल मोतीराम इंगळे (४९), उपसभापती प्रदीप मधुकरराव ढोले (६२), असे संशयितांचे नाव आहे.
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तक्रारदार यांचे शासन दरानुसार प्रती क्विंटल ४४ प्रमाणे १४ लाख ३९ हजार ५९२ रुपये बिल घेणे होते. यातील ४ लाख ९३ हजार रुपये मिळाले असून, उर्वरीत ९ लाख ४६ हजार ५९२ रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीकडे थकीत आहे. त्या थकीत रक्कमेसाठी १ लाख रुपये लाचेची मागणी होत होती. गेल्या अनेक दिवसांपासून ही रक्कम थकीत होती.
देयकांची रक्कम काढण्यासाठी संशयित आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अकोला कार्यालयात तक्रार केली होती. एसीबीच्या पथकाने तक्रारीची खात्री केल्यानंतर सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी सापळा रचला. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीत एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना उपसभापती प्रदीप ढोले याला रंगेहात पकडण्यात आले. यानंतर सभापती सुनिल इंगळे याला देखील ताब्यात घेण्यात आले. यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नरेंद्र खैरनार, डिगांबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, नीलेश शेगोकार, संदीप ताले, किशोर पवार, अभय बावस्कर, सुनील ऐलोने, पुरुषोत्तम मिसुरकर, अर्चना घोडेस्वार, दिलीप तिवळकर यांनी केली आहे. या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ अक्षरशः ढवळून निघाले आहे. याप्रकरणी प्रतिक्रीया घेण्यासाठी वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध