चाळीसगाव (प्रतिनिधी) मणिपूर येथील हिंसाचाराच्या आणि महिलांवरील अत्याचाराचा घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकार असमर्थ ठरत आहे. याचाच निषेध म्हणून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मणिपूर येथे प्रचंड हिंसाचार आणि महिलांवर अत्याचार होत असून महिलांना अक्षरशा निर्वस्त्र करून धिड काढली जात आहे. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत. गेल्या ४ मे पासून हे सत्र सुरूच असून अद्याप केंद्र सरकार या घटनेचा गांभीर्यपूर्वक विचार करून तेथील दोषींवर कारवाई करताना दिसून येत नाही. येथील हिंसाचाराच्या आणि महिलांवरील अत्याचाराचा घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकार असमर्थ ठरत असून याचा निषेध म्हणून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे( यांच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले असून येथील दोषींवर त्वरित कारवाई करावी हा हिंसाचार व महिलांवरील अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यात करण्यात आलेली आहे.
यावेळी तालुका प्रमुख रमेशआबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, प्रवक्ते दिलीप घोरपडे, ता. संघटक सुनील गायकवाड, शैलेंद्र सातपुते, महेंद्र जैस्वाल, वशिम चेअरमन रवी चौधरी, निलेश गायके, किरण आढाव,राजन कुमावत,रामेश्वर चौधरी, सुभाष राठोड, अण्णा पाटील, राॅकी धामणे, जगदीश महाजन, संजय ठाकरे, राजेश भालेराव, दिलीप राठोड,जावेद शेख, चेतन आढाव, आबासाहेब पाटील, भैया शिंदे, अनिल पाटील, नकूल पाटील आशिष सानप, अरुण पाटील, हिंमत निकम, दिलीप पाटील, नाना शिंदे, आबासाहेब पाटील, चेतन कुमावत,रोहीत जाधव, हर्षल माळी, देवचंद साबळे, विजय महाले, महीला आघाडी मोहिनी मगर, सविता कुमावत,काटे ताई,कविता साळवे, निर्मला आरख, सुनीता पवार, सुलतानबी खान, कांताबाई राठोड, संगीता जाट, संगीता मिस्त्री, अंजली काळे, बेबी चव्हाण आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.