चाळीसगाव (प्रतिनिधी) व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशजी उजैनवाल, जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्या उपस्थितीत चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश महाले यांची तर कार्याध्यक्षपदी मुराद पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आर.डी.चौधरी, एम बी पाटील, जिजाबराव वाघ, आनंद शिंपी, सूर्यकांत कदम यांचे मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष वाल्मीक गरुड, कार्याध्यक्ष मुराद पटेल, सचिव कलीम सैय्यद, सदस्य पदी रामलाल चौधरी, मंगेश शर्मा, योगेश मोरे, तारकेश्वर परदेशी, रणधीर जाधव, आकाश धुमाळ, शरीफ मिर्झा, अफरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधुभगिनींना व्हाईस ऑफ मिडियाचे सदस्य होऊन संघटना मार्फत होणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.