जळगाव (प्रतिनिधी) मार्ग बदलल्यानंतर आमच्यावर खूप टीका झाली, आम्हाला ट्रोल केलं गेलं. पण आम्ही सत्तेसाठी नव्हे तर तर हिंदुत्व वाचवण्यासाठी मार्ग बदलला. सत्तेसाठी सतरा शे साठ पण आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), असे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठणकावून सांगितले. ते जळगावातील हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.
संजय राऊत यांच्यावर सडकून टीका !
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांना (Sanjay Raut)41 मते पडली ती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते. आडवे झाले असते, राऊत यांच्यावर यापूर्वी याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मात्र स्पष्टच सूनावले आहे. लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांसह विरोधकांवर निशाणा साधला.
‘इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा’, ओवैसी बंधूंनाही फटकारले !
आम्ही कुणाच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण जर कुणी आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्ही काय गांधीजी नाहीत. या गालावर मारलं म्हणून त्या गालावर मारा. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितले होते. हे आपल्याला माहिती आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
खुर्चीपेक्षा धर्म महत्वाचा !
पावरा समाजाच्या धर्मांतराचे काम खिश्च्रनांकडून सुरु आहे. आमच्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने बघत असेल तर कुणी सहन करणार नाही. आज मी मंत्री आहे की आमदार आहे, त्यापेक्षा तुमच्यातला हिंदु आहे. खुर्ची देणारे आणि ओढणारेही तुम्ही आहात. खुर्चीपेक्षा धर्म महत्वाचा आहे. इतिहास बघितला तर जैन हे हिंदू आहेत. हिंदू जनजागृती समितीचे पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरु आहे. जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.