जळगाव (प्रतिनिधी) सप्टेंबर-२०२१ मध्ये होणाऱ्या शिकाउ उमेदवारांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी ९ ते २७ ऑगस्ट, २०२१ असा असून परीक्षा २५ ते २९ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
त्यापूर्वी सर्व शिकाउ उमेदवारांनी तसेच संबंधित आस्थापनांनी परीक्षेपुर्वीची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. असे आर. पी. पगारे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.