चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस २० वर्षीय तरुणाने पळवून नेत वेळोवेळी शरीर संबध ठेवल्या प्रकरणी त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या परिवारासमवेत वास्तव्यास आहे. दोन महिन्यापूर्वी २० वर्षीय संशयित आरोपी विलेश दारासिंग पावरा याने अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबध निर्माण करीत तिला लग्नाचे आमिष देत पळवून नेले. पिडीत तरुणीला नंदुरबार जिल्ह्यात एका गावात नेले. तेथे तिच्यासोबत राहून मुलीसोबत वेळोवेळी शरीर संबध ठेवत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विलेश दारासिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी संतोष चव्हाण हे करीत आहेत.