जळगाव (प्रतिनिधी) “शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार सन २०१६-२०१७ चा पुरस्कार मिळवण्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे सादर फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख शेख यांच्या फिर्यादीवरून याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
फारुख शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२००३ ते २०१६ च्या दरम्यान, प्रदीप कशोर प्रभाकर तळवेलकर (रा. शिवप्रभात, ३८ जिल्हापेठ, निम- स्वातंत्र्य चौक) यांनी स्वत: तसेच ला.ना. हायस्कुलचे क्रिडाशिक्षक प्रशांत राजाराम जगताप (रा. एल १७/ए महाविर नगर, विकास दुध फेडरेशन जवळ, जळगाव), डॉ. बी.पी. खिवसरा (प्राचार्य एन.एस.एस.एम. धंतोली, नागपुर) अशोक दुधारे (रा. पोखर पॅलेस, पोखर कॉलनी, दिंडोरी रोड, नाशिक), डॉ. उदय डोंगरे (रा. मुक्तांगण, रो हाऊस क्र.०३, जगतनेत्रा, प्लॉट क्र.३३ नाथप्रांगण, इमरलद सिटीच्या मागे, शिवाजी रोड, औरंगाबाद), डॉ. ए.एम.पाटील| (शारीरीक शिक्षक, शारीरीक शिक्षण महाविदयालय, डॉ.मुं.जे. मार्ग धंतोली नागपुर), एल.आर. मौर्य (रा. ३२५ एच गल्ली क्र.५ बाप्पा नगर, करोल बाग, नवी दिल्ली), श्रीकांत थोरात (रा. सिख मोहल्ला जिल्हा न्यायालयाजवळ, इंदौर म.प्र.), प्राध्यापक आसीफ खान अजमल खान क्रिडा (संचालक, गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेज जळगाव) आणि प्राध्यापक डॉ. देवदत्त पाटील (क्रिडासंचालक रा.कै.. नानाभाऊ एम टी पाटील आर्टस कॉलेज, मु.पो. मारवड ता. अमळनेर) यांनी आपसात संगनमत करुन कट रचून प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांना “शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार सन २०१६-२०१७ चे मानकरी- पुरस्कार मिळवून देण्यात खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४२०, १२० ब सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि.किशोर पवार हे करीत आहेत.