अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना सारख्या महामारीच्या काळात गौशाळेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी शहरातील जैन सोशल ग्रुपतर्फे गोशाळेला धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
अमळनेर येथील कांतिलाल ललुभाई गौशाळेला जैन सोशल ग्रुप, महाराष्ट्र रीजन गो ग्रास कमिटी व जैन सोशल ग्रुप अमळनेरतर्फे ५ हजारांचा चेक व २३३० रुपये असे एकूण ७३३० रोख स्वरुपात देण्यात आले. चेक देताना जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष महावीर सिंघवी सेक्रेटरी राजेश जैन, पूनम कोचर दिनेश लोढ़ा व संस्थेचे मैनेजर कीर्ती जैन व कर्मचारी हे उपस्थित होते.