चोपडा (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या रोटरी क्लब इंटरनॅशनल या संस्थेचे नवीन वर्ष जुलै पासून सुरू होते. त्याअनुषंगाने आज दि.१ जुलै पासुन सन २०२३ – २४ या वर्षांसाठी चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी चेतन निर्मल टाटीया, मानद सचिवपदी अर्पित अग्रवाल तर कोषाध्यक्ष म्हणून सीए पवन गुजराथी हे आपला पदभार स्वीकारणार आहेत.
सदर नूतन पदाधिकार्यांचा पद्ग्रहण सोहळा दि.१८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली खाली संपन्न होणार असून या समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री पोपटराव पवार (माजी सरपंच हिवरे बाजार) यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटे. राजीव शर्मा, डॉ.राहुल मयूर, अनील लोढा (मालेगाव), डॉ. निर्मल टाटीया असणार आहेत. शहरातील आनंदराज पॅलेस येथे हा पद्ग्रहण सोहळा संपन्न होईल.