मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. (CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Delhi Tour) शिंदे-फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
सहकार विभागाच्या एका कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते काही राजकीय भेटी घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठींची शक्यता आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेटण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाहांसोबतची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावेळी अनेक विकास कामांच लोकार्पण आणि उद्घाटन केलं होतं. शिवसेना हे पक्षाच नाव आणि धनुष्यबाण याबाबत निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra CM Shinde & Deputy CM Fadnavis Visit Delhi Today)