TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव लोकसभा मतदार संघ : ठाकरे गटाकडून करण पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

जाणून घ्या...ठाकरे गटाची रणनीती आणि राजकीय पटलावर सुरु असलेल्या खेळी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2024
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत करण पवार यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी आगामी दोन दिवसात सगळं स्पष्ट होईल, अशी सूचक प्रतिक्रीया दिली आहे.

पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी ठाकरे गटाच्या पाठिंब्याने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली होती; परंतु विधानसभेच्या दृष्टीनेही मशाल चिन्ह घराघरामध्ये पोहोचवणे गरजेचे असल्याने ठाकरे गटाने पवारांचा हा प्रस्ताव नाकारला होता. परंतू आता करण पवार यांनी थेट ठाकरे गटाची उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव मान्य केल्याचे कळते. विशेष म्हणजे खासदार उन्मेष पाटील हे देखील त्यांना मदत करणार असल्याचे कळते. एवढेच नव्हे तर अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील करण पवार यांच्याबाबतीत सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

जाणून घ्या…पडद्याआड सुरु असलेल्या घडामोडी !
विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर भाजपने मागील वेळी तिकीट मिळून ऐनवेळी उमेदवारी रद्द केलेल्या स्मिताताई वाघ यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे खासदार पाटील यांचा गट कमालीचा नाराज झाला. याच नाराजीचा फायदा ठाकरे गटाने घेण्याचे ठरवले आणि पडद्याआड घडामोडी सुरु केल्यात. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सुरवातीला थेट उन्मेष पाटील यांच्यासोबत संपर्क करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी पत्नी संपदा पाटील व पारोळा येथील  त्यांचे मित्र माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव सुचवले. परंतू शेवटी करण पवार यांचे फायनल केले. त्यानंतर पवार यांच्या नावावर गांभीर्याने ठाकरे गटाने विचार करायला सुरुवात केली. अपक्ष की पक्षाचे चिन्ह?, यावर काही दिवस खलबतं झाली. अगदी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क संजय सावंत यांनी करण पवार यांच्या विजयाची राजकीय आकडेवारी मांडल्यानंतर ठाकरे गटाकडून पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळतेय.

अशी आहे शिवसेनेची रणनीती !
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष नव्हेच तर शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात अनेक मित्र आहेत. तसेच गतवेळी स्मिताताई वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करून तिकीट रद्द करायला लावणारा भाजपातील नाराज गट देखील करण पवार यांना मदत करेल. तसेच खासदार उन्मेष पाटील हे करण पवार यांच्यासोबत उभे राहिल्यास त्यांना भाजपने लोकसभेसाठी तयार केलेली सर्व रणनीती आपोपाप वापरायला मिळेल. अगदी खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर होईल, या अपेक्षेने भाजपच्या रणनीतीनुसार उभी केलेली यंत्रणा करण पवार यांनी ‘रेडी टू युज’ मिळेल, अशी देखील शिवसेनेची रणनीती आहे.

राजकीय पटलावर सुरु झाल्या अनेक खेळी !
ठाकरे गटाचे संपर्क संजय सावंत यांनी राजकीय पटलावर अनेक खेळी सुरु केल्या आहेत. त्यानुसार अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे सोबत आल्यास स्मिताताई यांना स्वतःच्या तालुक्यातच रोखून धरण्याची शिवसेनेची रणनीती आहे. परंतू शिरीष चौधरी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे जोपर्यंत ते जाहीररित्या आपली भूमिका मांडत नाही. तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. जळगावात आमदार राजुमामा भोळे आणि भाजपातील अंतर्गत नाराजीला आपल्यासाठी कशी उपयोगात आणता येईल, याची देखील चाचपणी शिवसेनेने केली असल्याचे कळते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरणात पाच जणांना जन्मठेप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चेहऱ्याला दुपट्टे बांधून हल्लेखोरांनी सिनेस्टाईल दोघांवर चढवला हल्ला ; धारदार शस्त्राने भोसकून तरुणाचा खून !

August 17, 2023

पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरा ; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

April 28, 2022

‘पेगॅसस’ला कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले : संजय राऊत

July 25, 2021

लासगाव जवळ उभ्या ट्रकला चारचाकी कार धडकली ; एक जागीच ठार तर तीन जखमी !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group