TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरणात पाच जणांना जन्मठेप !

बहिणीसह तिच्या प्रियकराला संपवणाऱ्या भावांना शिक्षा ; पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणारा वकीलासही पाच वर्षांचा कारावास !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी सुनावली आहे. तर वकिलासह एकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले.

चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत वर्षा समाधान कोळी आणि राकेश संजय राजपूत यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाच्या माहिती मिळाल्यावरून संशयित आरोपी हे मुलीला वारंवार सांगायचे की, सदर मुलगा राकेश हा दुसऱ्या समाजाचा असल्यामुळे त्याच्याशी प्रेम संबंध तोडून टाकावे. मात्र त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी मयत

READ ALSO

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

राकेश राजपूत हा संशयित आरोपीच्या घरी रात्री आठ वाजता आल्याने व तो वर्षा कोळी हिच्याशी प्रेमसंबंध बाबत बोलू लागल्याने त्याचा संशयित आरोपींना राग आला. त्यांनी त्याला जाब विचारला. त्यावरून वाद झाला. यावेळी संशयीतांनी वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेले. तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला तर वर्षा कोळी ही प्रतिकार करीत असताना तिला देखील जागीच पकडून गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरू होता. संशयित आरोपींनी पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात २१ साक्षीदार तपासण्यात विशेष म्हणजे संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर वकील नितीन मंगल पाटील यांच्याकडे जाऊन खुणाबाबत सल्ला घेतला. खून करणे, खुनाची तयारी करणे तसेच पुरावा नष्ट करणे असे विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. तसेच एकमेकांसोबत झालेल्या संभाषणाच्या सीडीआर रिपोर्ट व एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच पिस्टल मधील गोळी या सर्व पुराव्यानुसार न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. तपासाअधिकारी डीवायएसपी ऋषिकेश रावले, नाशिकचे वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी, मयत राकेश राजपूत याची आई मिनाबाई संजय राजपूत तसेच इतर पुराव्यानुसार अमळनेर न्यायालयाने संशयित आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा न्यायाधीश २ पी. आर. चौधरी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील एड. किशोर बागुल यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात तुषार आनंदा कोळी (वय वर्ष २३), भरत संजय रायसिंग (वय वर्ष २२), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९), आनंदा आत्माराम कोळी (वय ५६) रवींद्र आनंदा कोळी (वय वर्ष २०) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच संशयित आरोपी पवन नवल माळी आणि वकील नितीन मंगल पाटील यांना पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे.खटल्या कामी पैरवी अधिकारी ए. एस. आय. उदयसिंग साळुंखे,पोहेको हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे आदींनी सहकार्य केले.

 आरोपींनी बहिणी व तिच्या प्रियकराला संपविल्यानंतर सल्ला घेण्यासाठी नितीन मंगल पाटील यांची भेट घेतली. यात नितीन पाटील याने कुटुंबातील विधी संघर्ष बालकाच्या हातात पिस्टल देऊन त्याला आरोपीचा पिंजऱ्यात उभं करा, अल्पवयीन असल्याने लगेच सुटेल, असा सल्ला आरोपींना दिला होता. यासह गुन्ह्यात वापरलेले कपडे जाळून टाकने, पुरावा नष्ट करण्यात मदत करणे, या आरोपांखाली नितीन पाटील यासह त्याला मदत करणाऱ्या पवन माळी या दोघांना पाच वर्षे करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच राहिल्याने विधी संघर्ष बालक हा त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्याने नितीन पाटील हा सल्ला देणारा वकीलच पुरावा नष्ट करण्यामागे असल्याचे निष्पन्न झाले. यासह आरोपी व नितीन पाटील यांच्यातील संभाषण सीडीआर रिपोर्टमुळे समोर आल्याने नितीन पाटील यास या प्रकरणात पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
Next Post

खळबळजनक : शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले विषारी औषध ; पाचोरा पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक ; दिल्ली, राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

April 12, 2023

सचिन वाझे प्रकरणाचा परिणाम सरकारवर होईल असं मला वाटत नाही : शरद पवार

March 16, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २७ जून २०२४ !

June 27, 2024

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात १६९४ मतदार करणार घरी बसल्या मतदान ; गृह भेटी द्वारे मतदान प्रक्रियेस जिल्ह्यात प्रारंभ !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group