नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात पत्र लिहिलं आहे.
नागपूर, नाशिक, मुंबई आणि मुंबई, नागपूर, हैद्राबाद बुलेट ट्रेन संदर्भात हे पत्र आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग यांच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी थेट मोदींना पत्र पाठवून पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी राज्य आणि केंद्र सरकार मिळून राज्यातला प्रकल्प पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त केला आहे.
रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकारकडून ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडोर मंजूर करण्यात आलेत. त्यात राज्यातील दोन हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा समावेश केला आहे. यात नागपूर- नाशिक- मुंबई आणि मुंबई- पुणे- हैदराबाग या दोन रेल्वे कॉरिडोरचा समावेश आहे. या कॉरिडोरसाठी राज्य सरकारकडून सर्व मदत मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.
मात्र पूर्वीचा गुजरात- मुंबई जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाविषयी या पत्रात कोणताही उल्लेख केलेला नाही आणि रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर याचा विचार करावा जेणेकरुन महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागेल तसंच हैद्राबादचं मार्केट आणि मुंबईचं मार्केट दोन्ही जोडता येईल असा प्रस्ताव या पत्राद्वारे मांडण्यात आलेला आहे.