जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकास शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांनी खानदेश सेंट्रल मॉल परिसरात चांगलाच चोप दिला आहे.
युवकास केले पोलिसांच्या स्वाधीन
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त झालेले शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावात सेंट्रल मॉल परिसरात सदर तरुणाचा शोध घेऊन त्याचा चांगलाच चोप दिला. हेमंत दुधिया असे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान युवकास चोप दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.