जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरिविठ्ठल नगर भागात बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताचअ पोलिस व महिला व बाल कल्याण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वेळेतच बालविवाह रोखला.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती दिली होती. माहिती मिळाताच महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख विजयसिंह परदेशी यांना चाईल्ड हेल्प लाईन पथकाला सूचित केले. दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलिसांसह पथक घटनास्थळी राजीव गांधी नगर परिसरातील ओंकार कॉलनी येथे पोहोचले आणि वधू व वराची सर्व शासकीय कागदपत्रे तपासली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. मुलीचे वय साधारण १७ वर्षे २४ दिवस पुर्ण झाले होते. तर मुलाचे वय हे २२ वर्षे पुर्ण होते. हे दोघेही हरिविठ्ठल नगर परिसरातील राहणारे असून नातेवाईकांना रामानंद नगर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानुसार दोन्ही कुटुंबियांकडून लेखी जवाब लिहून घेतली. यामध्ये मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतरच विवाह करू असे लिहलेले आहे.
यांनी केली कारवाई
कारवाई करणाऱ्या पथकामध्ये जिल्हा बाल संरक्षण विभागाचे पथक योगेश मुक्कावार, समुपदेशक पांडुरंग पाटील, चाइल्ड हेल्पलाइनचे भानुदास येवलेकर, समुपदेशक सौ. जोशी, पोलीस अधिकारी रुपेश ठाकूर व त्यांचे कर्मचारी यांचा समावेश होता. बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी सतर्क राहून असे प्रकार कुठे घडत असेल, तर जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाला माहिती द्यावी असे आवाहन विभागाचे प्रमुख विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.