चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सदस्यांचा शपथ ग्रहण समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, चोपडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमृतराव सचदेव, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल आणि पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यासाठी त्यांना शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. शारदा मातेला वंदन करणारे नृत्य इयत्ता सातवीच्या विद्यर्थिनीनी सादर केले. त्यासाठी त्यांना शाळेच्या नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांचा प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी मोहित भागवत पाटील आणि मुलींची प्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पूर्वी पवन अग्रवाल यांनी शपथ ग्रहण केली. विविध विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील शपथ ग्रहण केली.
यात खेळ विभाग प्रमुख म्हणून अनिकेत साळुंखे व जिनिषा क्षीरसागर , सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून पियुष पाटील व आदिती सिंधी, शिस्त विभाग प्रमुख म्हणून देवांशू पाटील व रिद्धीमा सोनवणे, रेड हाऊस लीडर जयेश पाटील वअंजली पोळ, यलो हाऊस लीडर प्रियांषू पाटील व तन्वी पाटील, ग्रीन हाऊस लीडर मनीष शिरसाठ व मंदाश्री पाटील, ब्लू हाऊस लीडर राजवीर पाटील व रोहित मराठे यांनी देखील शपथ ग्रहण केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मांडले. संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी मोहित पाटील आणि पूर्वी अग्रवाल यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. अंजली पोळ आणि जीनिषा क्षीरसागर यांना गर्ल्स डबल चॅम्पियनशिप मध्ये प्राप्त केलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. शार्ली महाजन आणि तनिष्क माळी यांना कराटे चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन केल्यानिमित्त सन्मानित करण्यात आले.
शाळेचा माजी विद्यार्थी शब्बीर ख़ुज़म अनीस याने JEE आणि MHT-CET मध्ये प्राप्त केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक अमन पटेल, विशाल मराठे दीप्ती पाटील आणि पूजा चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन भूषण गुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.