चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८१.९१ टक्के लागला आहे.
या परीक्षेत प्रविष्ट ९४ विद्यार्थ्यांपैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात रोहित विजय पारधी ७६.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. द्वितीय क्रमांक आरती रमेश कोळी ७५.४० टक्के तृतीय क्रमांक ऋषिकेश रवींद्र कोळी ७४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी,उपाध्यक्ष द्रविलाल पाटील,सचिव जवरीलाल जैन,सहसचिव भानुदास पाटील यांच्यासह संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी. चौधरी,पर्यवेक्षक व्ही.ए. नागपुरे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.