चोपडा (प्रतिनिधी) वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तालुका हादरला आहे. (Teenager Rape Case In chopda)
लहान भावाला मारून टाकण्याची धमकी पीडीतेवर अत्याचार !
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित विलास सुभाष भिल (वय २०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही, संशयिताने तिच्या लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत, पीडीतेवर अत्याचार केला. मे, जून व डिसेंबर २०२२ जानेवारी व फेब्रुवारीत त्याने शेतात, कॉलेजमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर अत्याचार केला. तसेच पिडीतेसोबत असलेले फोटो हे इंस्टाग्रामवर प्रसारीतही केले. या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून संशयितावर चोपडा शहर पोलिस स्टेशनला कलम ३७६, (१), सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा अधिनियम २०१२ च्या कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्रेमसंबंध निर्माण करून अत्याचार !
तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवतीशी समीर सलीम पिंजारी (वय २२) याचे प्रेमसंबंध होते. त्यातून संशयिताने पिडीतेसोबत १३ जानेवारी २०२२ ते ६ जानेवारी २०२३ च्या दरम्यान, शेतात वेळेवेळी शरीर संबंध निर्माण केले. संशयित समीर सलीम पिंजारी याने पीडीतेशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. परंतू पिडीतेने प्रेम संबंध ठेवण्यास नंतर नकार दिल्यावर समीरने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून समीर पिंजारी याच्या विरोधात चोपडा शहर पोलिस स्टेशन मध्ये कलम ३७६ (१) सह, बाल लैंगिक गुन्ह्याच्या अधिनियम कलम ४, ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे हे करत आहेत. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.