चोपडा (प्रतिनिधी) अखिल भारतीय साहित्य परिषदेची भाषा आणि साहित्य प्रांतात वेगळी अशी ठळक ओळख आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये अ.भा.सा.परिषदेच्या विविध शाखा आहेत. नुकतीच चोपडा तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रातील विद्वान अशोक सोमाणी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सोबत कार्याध्यक्ष म्हणून गोविंद गुजराथी आणि कवी प्रभाकर महाजन सचिव पदी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद,चोपडा शाखेची कार्यकारिणी अशाप्रकारे आहे.
अध्यक्ष- अशोक सोमाणी, कार्याध्यक्ष- गोविंद गुजराथी, उपाध्यक्ष- नरेंद्र भावे, उपाध्यक्ष-वैद्य सौ.प्राजक्ता महाले, सचिव- प्रभाकर महाजन, संघटन मंत्री- संजिव शेटे, प्रसिध्दी प्रमुख- उमेश नगराळे, कार्यकारणी सदस्य-१) मोहन चव्हाण, २) डॅा.किशोर पाठक, ३) तुषार लोहार, ४) प्रशांत गुरव, ५) प्रा.संजय नेवे, ६)सौ.प्रिती सरवैय्या पाटील, ७)सौ.प्रा.मोहिनी उपासनी, मार्गदर्शक / सल्लागार- प्रा.एस.टी.कुळकर्णी आणि महेशकुमार शर्मा.
या नूतन कार्यकारिणीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गीतकार प्रवीण दवणे, प्रदेशाचे कार्याध्यक्ष आणि साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य प्रा.नरेंद्र पाठक, देवगिरी प्रांत अध्यक्ष श्रीकांत उमरीकर, कार्याध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पाटील, महामंत्री प्रा.विजय लोहार, संघटनमंत्री शशिकांत घासकडबी व पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.