धरणगाव (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील विविध १५ ठिकाणी स्वच्छता मोहीम व श्रमदान उपक्रम राबविण्यात आले.
धरणगाव नगरपरिषदेतर्फे शहरात नवेगाव, मारीमाता मंदिर परिसर, पारधी वाडा, मटण मार्केट परिसर, बालाजी मंदीर परिसर, कृष्णा गीता नगर, जी एस नगर सह नगरपालिका कार्यालय परिसर, जलशुध्दीकरण केंद्र इत्यादी भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गटारींची साफसफाई, जंतुनाशक पावडर फवारणी, मोकळ्या जागांची स्वच्छता, झाडुकाम इत्यादी कामे करण्यात आली.तसेच शहरातील बालकवी ठोंबरे विद्यालय मार्फत बालकवी विद्यालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ग्रामीण रुग्णालय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याभागात श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविली.
पी.आर. हायस्कूल मार्फत शालेय परिसर तसेच शाळेच्या आजूबाजूचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ स्वच्छतेची शपथ घेण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील सहसंपर्कप्रमख गुलाबराव वाघ, कैलास माळी सर, पी.आर हायस्कूल चे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, बालकवी ठोंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. पाटील सर व जीवन पाटील सर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातिला कैलास माळी सर यांनी स्वच्छता ही सेवा या मोहीम बाबत माहिती दिली तर मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी स्वच्छतेची शपथ दिली आणि नागरिकांनी सुध्दा स्वच्छतेचे महत्व समजून शहर स्वच्छ सुंदर करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. सदरची मोहीम यशस्वी करणेसाठी मुख्याधिकारी विकास नवाळे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक संजय मीसर, प्रणव पाटील, रवींद्र गांगुर्डे, निलेश वाणी महेश चौधरी यांचेसह सर्व न. पा. अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.