बोदवड (प्रतिनिधी) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मुक्ताईभवनमध्ये कर्करोग, मोतिबिंदू शिबीर आज संपन्न झाले.
शिबिराचे उदघाटन आमदार पाटील यांच्या पत्नी यामिनी चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी कर्करोग, मोतिबिंदू तपासणीमध्ये ७१७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात कर्करोग तपासणी 200 महीला व 100 पुरुष यांनी करून घेतली. तर मोतिबिंदूसाठी 470 महीला व पुरूष यांनी तपासणी केली. कर्करोग तपासणीत 35 रूग्ण तपासणी अति संशयित आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी योग्य तो सल्ला दिला गेला. या शिबिरासाठी नाशिक येथील कर्करोग डॉक्टर कौस्तुभ भेडाळे, डॉक्टर सौरभ पालीवाल, डॉक्टर रिया करेडा, डॉक्टर स्नेहल दुग्गड, अयुश दुग्गड, राहुल सुर्यवंशी, डॉ.प्रविण पाटील, डॉ मुकुंद गोसावी, अध्यक्ष मुक्ती फाउंडेशन जळगाव विनोद पाटील, प्रविण खरे, शैलेश कराळे, शितल पाटील, प्रमिला वाघ यांनी रुग्ण तपासणी केली.
आमदार पाटील मुंबईत कामानिमित्त असल्याने त्यांच्या पत्नी यामिनी पाटील या शिबिरास उपस्थित होत्या. शिबिराचे वेळी प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष आनंदा पाटील, संजना पाटील, सविता उल्लेख मिठुलाल अग्रवाल, व्यापारी मंडळ अध्यक्ष गोपाल अग्रवाल, बालविकास प्रकल्प अधिकारी दमयंती इगळे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. उध्दव पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी आरोग्य दुत गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, नगरसेवक सईद बागवान, सुनील बोरसे, राजेश नानवानी, दिनेश माळी ,नितीन चव्हाण, उपनगराध्यक्ष रेखा गायकवाड, नगरसेविका बेबिबाई चव्हाण, बेबिबाई माळी, मीराबाई माळी, शारदा बोरसे, पुजा बरडीया ,दिपक माळी यांनी परिश्रम घेतले.