एरंडोल (प्रतिनिधी) आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन एरंडोलला दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात येणार आहे.
एरंडोल शहरातील प्रभाग क्र ४ व ६ माळीवाडा परिसरातील अब्दुल पिंजारी यांच्या घरापासुन ते मन्सराम सोनु महाजन यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १२ लाख, एरंडोल शहरातील अनिल गणपतीची काबरे व देवरे जवेलर्स यांच्या घरापासून ते गोविंद लढे सर यांच्या घरामागून व गुजर गल्ली मारोती मढीपर्यंत रस्त्यासह गटारीचे काँक्रीटीकरण करण्यासाठी २० लाख, एरंडोल शहरातील गट नं १८२१ येथे गटारी बांधकाम करण्यासाठी १० लाख, एरंडोल शहरातील गट नं १८२१ येथे संरक्षण भिंती बांधकाम करण्यासाठी २८ लाख, एरंडोल शहरातील प्रभाग क्र ९ मध्ये जय गुरू व्यायाम शाळेपासून ते प्रमोदजी दुबे यांच्या घरापर्यंत रस्त्यासह गटारींचे काँक्रीटीकरण करण्यासाठी २० लाख, एरंडोल शहरातील न.पा गार्डन समोर गट नं ८४० येथे महिला व पुरूषासाठी २० शिटचे बांधण्यासाठी २० लाख, असा खर्च या विकास कामांसाठी करण्यात येणार आहे.