बोदवड (प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत बोदवड नगरपंचायतीसाठी अग्निशमन बंब, दोन घंटा गाड्या आणि ट्रॅक्टर या वाहनांचा लोकार्पण सोहळा तसेच माजी सैनिक व ८० सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. येथील गांधी चौकात सायंकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युनूस बागवान होते. यावेळी नगराध्यक्ष आंनदा पाटील, उपानगरध्यक्षा रेखा गायकवाड, डॉ.उध्दव पाटील,मिठूलाल अग्रवाल,गोपाल अग्रवाल ,सईद बागवान,विकास कोटेचा, माजी जि,प, सदस्या कस्तुराबाई घुले, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन तायडे अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहरात दोनच मंगल कार्यालय आहेत म्हणून प्रत्येक समाजाचे सभागृह मंगल कार्यालय व्हावे, यासाठी मराठा समाज, राजपूत, वंजारी, न्हावी, माळी या समाजाच्या सभागृहासाठी निधी मंजूर झाला आहे. तसेच शहरात दत्त काँलनी, रूपनगर, आनंद नगर यासह इतर परिसरात रस्ते गटारी कामे मंजूर केलीत. विविध कामांसाठी कोटी रूपये निधी आणाला असून या शहरासह तालुक्याला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मागील लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील ५१ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनर्जीवत केली. पण ह्या योजने कडे लक्षच दिले नाही. हे काम करताना २०३८ मध्ये वाढ होणारी लोकसंख्या लक्षात घेता योजनेचे काम व्हायला पाहीजे होते. पण जुनी योजना माणसी ४०लिटर पाणी देते. वास्तविक ५५ लिटर पाणी मिळायला हवे. त्यांनी केलेल्या योजनेमुळे योजनेमुळे ४९ लिटर पाणी रोटेशन पध्दतीने प्रत्येक गावाला द्यावे लागत आहे.
या तालुक्याने ३० वर्ष निवडून दिले. त्यात त्यांनी युती काळात मंत्री. त्यानतंर पुढे विरोधी पक्षनेते आणि मागील काळात बारा खात्याचे मंत्री येवढी मोठ्या पदावर काम केले. त्यांनी बारामती सारखा विकास तालुक्यात केला पाहिजे होता. पण आपणास दुष्काळ पाहावा लागत आहे, असेही आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता आमदार चंद्रकांत पाटील यांनी टिका केली. अमृत योजनेतून शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व तालुक्याला वेगळी मंजूर करणार आणि दररोज शुद्ध पाणी पुरवठा करणार आणि जलसिंचन योजनेसाठी नियामकमंडळाची परवानगी मिळाली असून जामठी जलसिंचन योजनेचे लवकरच उदघाटन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील मराठी शाळा परिसरातील कांप्लेक्स मंजूरी मिळाली आहे. या मतदार संघातील युवकाचा रोजगाराचा प्रश्न सुध्दा सोडवणार असून एमआयडीसीचा पण लवकरच मार्ग मोकळा होणार आहे. जे होणार तेच मी बोलतो आणि एका वर्षात ही सर्व कामे मार्गी लागणार असे आश्वासन मी देतो असेही आमदार पाटील यानी सांगितले. यावेळी अग्निशमन बंब गाडीची मागणी दहा वर्षापासून जिनिंग संघाकडून होत होती. मागणी पूर्ण झाल्यामुळे जिनिंग संघ, व्यापारी संघटना, ज्वेलर्स संघ ,मेडीकल डॉक्टर युनियन, महाकाल ग्रुप यासह विविध संघटनेकडून आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुनिल बोरसे, नगरसेविका पुजा जैन, मिराबाई माळी, बेबिबाई चव्हाण, बेबिबाई माळी, शारदा बोरसे, सुनिता बडगुजर, दिनेश माळी, गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, नितीन चव्हाण, देवेंद्र खेवलकर, शांताराम कोळी, सुनिल बोरसे, संजय गायकवाड, दिपक माळी, हरून सोदागर, रईस ठेकेदार, काली शेख, मनोज पाटील, धनराज गंगतिरे, अप्पूभाजा, असलम बागवान ,इरफान शेख यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडक पुतळ्याला व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अग्निशमन गाडी ,घंटा गाडी टँकर याचे लोकार्पण करण्यात आले नंतर माजी सैनिक सफाई कर्मचारी याचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ उद्धव पाटील यांनी केले सुत्रसंचालन संदिप तायडे तर आभार प्रदर्शन जितेंद्र पाटील यांनी मानले.