नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्युंच्या संख्येतही घट दिसून आली. गेल्या २४ तासांत देशात एक लाख ६३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २,४२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाख ६३६ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, २४२७ नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, १ लाख ७४ हजार ३९९ कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली.
एकूण आकडेवारी किती?
एकूण कोरोनाबाधित – २ कोटी ८९ लाख ९ हजार ९७५
एकूण कोरोनामुक्त – २ कोची ७१ लाख ५९ हजार १८०
एकूण मृत्यू – ३ लाख ४९ हजार १८६
एकूण सक्रिय रुग्ण – १४ लाख ०१ हजार ६०९
देशातली लसीकरण मोहीम सध्या जोमात सुरु असल्याचं दिसत आहे. मागील २४ तासांत १३ लाख ९० हजार ९१६ लसी देण्यात आल्या. ज्यामुळं एकूण लसीकरणाचा आकडा २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचला आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार रविवारच्या दिवसभरात देशात १५ लाख ८७ हजार ५८९ नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रापेक्षा केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये दिवसाला सर्वाधिक रुग्णांची वाढ होत आहे. रविवारी महाराष्ट्रात १२ हजार ५५७ नवे कोरोनाबाधित आढळले. तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे १४ हजार ६७२, २० हजार ४२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.