जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०२, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ६०१ पर्यंत पोहचली असून १ लाख ३९ हजार ९४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७७ रुग्ण सध्या उपचार घेताय.