जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग ५ मध्ये अमृत योजना आणि भूमिगत गटारमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. महापौरांनी पाहणी केल्यानंतर ५ गल्लीत रस्ते तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. रस्ते तयार करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पहिल्या गल्लीत रस्ता तयार करण्यात येत आहे.
प्रभाग ५ मधील ५ गल्लीत रस्ते तयार करण्याच्या कामाचा एकादशीच्या दिवशी भूमिपूजन करण्यात आले होते. जुना डांबरी रस्ता काढून नवीन रस्ता तयार करण्यास सुरुवात झाली आहे. अमृत योजना आणि भूमिगत गटारीमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून नागरिकांचे हाल होत होते. ५ गल्लीतील रस्ते तयार करण्यात येणार असून उद्या महापौर सौ.भारती सोनवणे कामाची पाहणी करणार आहेत.