शहादा (प्रतिनिधी) समस्त गुजर नाभिक समाज पंच शहादा नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री. संत सेना समाज सेवा मंडळ शहादाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्त हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहादा येथील शहादा तालुका खरेदी विक्री संघ प्रांगणात शुक्रवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ व श्री संतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा समाजाचा ८ वा व श्री. संत सेना समाज सेवा मंडळाचा वतीने द्वितीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. केवळ नाममात्र एकवीस रुपयात वर – वधुंची नाव नोंदणी केली जात असून आतापर्यंत २२ उपवर – वधू म्हणजे ११ जोडप्यांची नोंदणी झाली आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्या (दि. ९ फेब्रुवारी रोजी ) दुपारी १ वाजता सामाजिक रिती रीवाज व परंपरेनुसार २२ उपवर – वधू म्हणजे ११ जोडप्यांना हळद , हरिद्रालेपन , रास पूजन , बेल माथनी पूजन , दीप पूजन सार्थक , पुजाविधी , नवग्रह शांती यज्ञ , पेहरावणी , पाणेतर , भोजन होऊन रात्री रासगरबा आदी कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत तसेच दुसऱ्या दिवशी , दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नवरदेवांची शोभायात्रा मिरवणूक अंबाजी माता मंदिर खेतिया रोड पासून खरेदी विक्री संकुल पर्यंत निघणार आहे. सकाळी १०:३० वाजता सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. याची जय्यत तयारी समाजसेवा मंडळाच्याच वतीने करण्यात येत आहे.
या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र , गुजरात आणि मध्य प्रदेश आदी राज्यातील चार ते पाच हजार समाज बांधव व आप्तेष्ट तसेच राजकीय, सामाजिक , आर्थिक , सहकार , विविध प्रसार माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे .
या सोहळ्यात वर – वधु पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, धार्मिक विधीसाठी स्वतंत्र पुरोहित, फोटोग्राफर , व्हिडिओ चित्रीकरण , विविध संसार उपयोगी साहित्य वितरण , विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण , वाजंत्री समाज प्रथे प्रमाणे हळद, नवग्रह शांती यज्ञ , पेहरावणी , पाणेतर , सत्यनारायण कथा , विदाई आदी सर्व विधी तसेच स्वतंत्र मोठे २ मंडप , शुद्ध पिण्याचे पाणी, भोजनावळ, उपवर – वधू व पालकांसाठीसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था , विवाह पत्रिका , वर- वधू व पालकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, फिरते शौचालय, मंडपात सी. सी. टि. व्ही. कॅमेरा , ड्रोन कॅमेरा , वॉकी टॉकी , डॉक्टर , प्रथमोपचार कक्ष , रुग्णवाहिका , अग्निशामक बंबाची गाडी , मोठे एल. ई. डी. टि. व्ही. स्क्रीन , विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमांवर सरळ प्रक्षेपण आदी सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी वधू मातेस महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून १०,००० रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बेटा बेटी एकसमान , बेटी बचाओ बेटी पढाओ, अन्न , पाणी वाचवा असा संदेश देणारी जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत.
हळद समारंभ , बिदाई ते सत्यनारायण कथा असा दोन दिवस चालणारा हा परिसरातील एकमेव आगळा वेगळा विवाह सोहळा असून या सोहळ्यातील भोजनावळीकरिता अनेक दानशूर दात्यांनी अन्नदानासाठी मदत करीत आहेत. याकामी समाजातील विविध संस्था, संघटना, तरुण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे , या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, समाज पंच मंडळ , युवा संघ , महिला मंडळ यांच्यासह समाजातील गावोगावी असलेल्या विविध संघटना अहोरात्र परिश्रम घेत आहेत.